image

आपला ब्राह्मण महासंघ थोडा वेगळा आहे

वर्षातून एकदा मुख्यमंत्र्यांना आर्थिक विकास महामंडळ साठी अर्ज देणे, आरक्षणाची मागणी, प्रत्येक महिन्यात आपल्या ऐतिहासिक आणि आदरणीय व्यक्तींना कुणी टीका केली तर त्याचा निषेध, गुणवणतांचा सत्कार, मान्यवरांना पुरस्कार, वर्धापन दिन, पुरोहित मानधन मागणी, सामुदायिक मुंज, हे महत्वाचे कार्यक्रम सर्वच ब्राम्हण संघटना करीत आहेत, आपल्या त्यांना केवळ शुभेच्छाच नव्हे, तर अशा कोणत्याही संघटनेच्या कार्यक्रमांना पूर्ण मदतच करण्याच्या सूचना आपल्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.

ब्राह्मण महासंघाची उद्दिष्टे वेगळी आहेत

 • असा युवक तयार करायचा की, जो मागणारा नाही देणारा असेल. तो योग्य मार्गदर्शन घेऊन प्रशासनात जाईल.तो उद्योग करेल, तो अध्यात्मिक क्षेत्रात असेल तर तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच पूजनीय व आदरणीय असेल. 
 • महिलांना अनेक क्षेत्रात व्यासपीठ उभे करून देणे, त्यांच्या मदतीला हात उभे करून देणे, हे आमचं स्वप्न आहे, आणि अशा संस्था उभ्या करणं शक्य आहे.
 • राजकीय अस्तित्वाची ताकद आपल्याला पण मान्य आहे, पण ती पाठिंबा किंवा विरोध अशी कुणाच्या हातची बाहुली बनलेली नसावी, त्यापेक्षा त्यांना आपला फायदा किंवा उपद्रव क्षमता दाखवणारी असावी. भविष्यात कदाचित राजकीय भूमिका घेऊ सुद्धा पण ती ठामच असेल, शक्ती नसेल तर संधीची वाट पाहत शांत राहू.
 • पण आपल्याच लोकांवर अन्याय करणाऱ्या लोकांना विरोध करणे, मग भेटायला जाणे गुप्त वाटाघाटी करणे, आणि दुसऱ्या दिवशी चक्क त्याच्याच नावाचे उपरणे गळ्यात घालून निर्लज्जपणे त्याच्याच बरोबर प्रचारासाठी फिरणे, हे पाप आपण कधीच करणार नाही. याला काही वर्षे नाही तर काही दशक लागणार आहेत, पण होईलच. आपल्यावर होणारी टीका ही यशाची पावती असते. आपण त्या विनम्रतेने स्वीकारू!

आपलं ठरलं होतं कस जायचं ते, तसच चाललो आहे!

 • आपल्या महासंघाच्या स्थापने पासूनच आपले ध्येय आणि मार्ग स्पष्ट होते, अगदी त्याच मार्गांवर जातो आहोत आपण, म्हणूनच राज्यभरात जेवढं संघटन सुरुवातीच्या 5 वर्षात करण्याचं नियोजन होतं, ते पहिल्याच वर्षात झालं.स्थापनेपासून तर संलग्न संस्था उभ्या करण्याचे तर त्यापुढील 5 वर्षांचे नियोजन होते, पण त्या पण अवघ्या 18 महिन्यात झाल्या, ते सुद्धा त्यातले 8 महिने लॉकडाऊन असताना.
 • पतसंस्थेला पत्रकार संघाचा आदर्श पतसंस्था पुरस्कार असो, नुकतंच सुरू झालेल ग्राहक भांडार असो, 'DESI' ला मिळालेली अधिकृत ट्रेनिंग सेंटर ची मान्यता असो, नाहीतर 15000 घरांत जात असलेले 'हिंदूत्व' मासिक असो, आजपर्यंत ब्राह्मण महासंघाने जे जे ठरवलं, हाती घेतलं, ते सर्व अपेक्षित वेळे आधी, आणि अपेक्षे पेक्षा जास्त यशात पूर्ण केलं.
 • आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असताना सामाजिक जबाबदारी पण तेवढीच संयमाने निभावली.
 • 1800 पोलिसांना कोरोना किट देणं असो, 300 पुरोहितांना किराणा किट देणं असो, किंवा जवळपास एक लाख रुपयांचा वैद्यकीय किंवा शिक्षण निधी उपलब्ध करून देणे असो, की आर्थिक आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणे असो, चिपळूण ला पाठवलेली 4 लक्ष रुपयांची मदत तर महासंघाने अवघ्या 24 तासात उपलब्ध केली.
 • महासंघ आपल्या नैतिक जबाबदारीतुन कधीही मागे सरकला नाही, याचा महासंघाला सार्थ अभिमान आहे. आणि ही सर्व कार्ये झाली ती पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता. (महासंघ कोणतेही शुल्क घेत नाही, ना वार्षिक ना आजन्म)
 • पण हे करताना संघटना बांधणी, त्याच महत्व, पदाधिकारी विकास, आक्रमकता यांकडे आपलं दुर्लक्ष झाले नाही, होणार नाही. किंबहुना तेच आपलं पहिलं उद्दिष्ट आहे.
 • या सगळ्या संस्था उभ्या करायच्या, सामाजिक कार्य करायची, ते ब्राह्मण महासंघ मजबूत करण्यासाठीच हे आधीपासूनच स्पष्ट आहे.
 • आपल्या या यशात, महासंघ बांधणीत, आणि 4 संस्था उत्तम मार्गस्थ करण्यासाठी शेकडो पदाधिकारी रोज मेहनत घेत आहेत, अक्षरशः झटत आहेत, त्या सर्वांचे सर्वप्रथम आभार. मदतीसाठी आवाहन करताच ताकदीने मागे उभ्या रहाणाऱ्या बंधू आणि भगिनींप्रति आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो.
 • सर्व संलग्न संस्थांवर, सर्व संचालक मंडळावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्या गुंतवणूकदारांना पण मनापासून धन्यवाद. आम्ही आपल्या विश्वासास पात्र राहू अशी आम्ही सर्व आपणास खात्री देतो.
 • नियतीने सोपवलेली आपली सामाजिक, आर्थिक व राजकीय सुद्धा जबाबदारी महासंघ पूर्ण करत आलेला आहे तसेच भविष्यात करत राहील. 

Enquire Now ! Or Call On ९८२२१ ७६६६४.

Just submit your contact details and we'll be in touch shortly.

ऑनलाईन नोकरी संस्था

रिअल इस्टेट सल्लागार